Sharad Pawar news esakal
महाराष्ट्र बातम्या

'तेव्हा 'न्यू बेळगाव'चा प्रस्ताव मांडला होता'; कर्नाटक निवडणूकीपूर्वी शरद पवारांचा पुस्तकातून गौप्यस्फोट

रोहित कणसे

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. आगामी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीमावादाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांचे लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले आहे. या पुस्तकात शरद पवारांनी अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.

या पुस्तकातच शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्न सोडवण्यासाठी न्यू बेळगाव चा प्रस्ताव मांडला होता अशी खळबळजनक माहिती दिली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेली ६३ वर्षं भिजत असतानाच मुंबई केंद्रशासित होणार असल्याची चर्चा तितकीच जुनी आहे. मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढावी, असं दिल्लीतल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीनं सांगू शकतो, असेही शरद पवार त्यांच्या पुस्तकात म्हणाले आहेत.

दरम्यान सीमाप्रश्नाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र प्रश्न भिजत पडण्यापेक्षा त्यावर सर्वमान्य आणि किमान समाधानकारक तोडगा काढायला हवा असेही पवार यावेळी म्हणतात.

पुढे त्यांनी लिहीलं की, सीमावादावर एक तोडगा मी सुचवला होता. बेळगाव महाराष्ट्राला मिळायला हवं, ही आपली इच्छा होती आणि आहे. तिथल्या मराठी माणसालाही महाराष्ट्रात येण्याची तीव्र इच्छा आहे. त्या दृष्टीनं मी 'न्यू बेळगाव'चा प्रस्ताव मांडला होता, असे शरद पवारांनी लिहीलं आहे.

त्यांनी पुढे या योजनेविषयी सविस्तर माहिती देखील दिली आहे. योजना अशी, की महाराष्ट्राच्या हद्दीत कर्नाटक सीमेपासून चौदा किलोमीटर अंतरावर सिडकोनं एक उपनगर विकसित करावं. तिथे मराठी शिक्षणाची सोय करावी, राज्याच्या सर्व योजना इथे राहणाऱ्यांना लागू कराव्यात. मराठी माणसांनी त्यांचा व्यापारउदीम, नोकऱ्या बेळगावात करायला हरकत नाही. बेळगावमधली त्यांची निवासस्थानं न सोडताही त्यांना महाराष्ट्रात स्थायिक होण्याची संधी देणारी ही योजना होती. मराठीशी त्यांची नाळ राहावी आणि महाराष्ट्रात राहण्याची भावना प्रत्यक्षात यावी, या दृष्टीनं योजना आखली होती, असे शरद पवार म्हणालेत.

या प्रस्तावाला महाराष्ट्रातल्या बहुसंख्य नेत्यांनी पाठिंबा दिला होता. फार गवगवा न करता, योजना अमलात आणा, असा त्यांचा आग्रह होता. अगदी शिवसेनेलाही हा प्रस्ताव मान्य असला, तरी त्याला जाहीरपणे मात्र विरोधच करणार, असं त्या वेळी मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट केलं होतं.

याच्या विरोधात सूर फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे किरण ठाकूर यांचा होता. 'आम्हाला 'मोडकंतोडकं बेळगाव नको,' अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या प्रयत्नानंतर हा विषय अद्याप कोणताही तोडगा न निघता भिजत घोंगड्यासारखा पडला आहे, असेही शरद पवार पुस्तकात म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT