Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: केंद्रीय मंत्र्यांची थेट शरद पवारांना ऑफर; NDA सोबत युती?

शरद पवार यांनी NDA सोबत यावं केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील अनेक नाट्यमय घडामोडीनंतर आणि सत्तासंघर्षानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळंचं वळण आलं असल्याचं पहायला मिळालं आहे. तीनवेळा सरकार आलं, मुख्यमंत्री शपथ झाली, तरी देखील राज्यातील अस्थिरता कायम असल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे आता या संपुर्ण घडामोडीवर कायमचा तोडगा निघावा, अशी अपेक्षा केली जात आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्र्याने थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एनडीएसोबत येण्याची ऑफर दिली आहे.

नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी एनडीए सोबत येण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींकडून शरद पवार यांचं अनेक वेळा कौतूक झालं आहे, असं रामदार आठवले म्हणाले आहेत. शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं, अशी खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे.

तर पुढे बोलताना रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लक्ष केलं आहे. बोलताना म्हणाले की, राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये, भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कश्या लावता येतील ते बघावं, भोंग्याना विरोध करू नये. राज ठाकरे यांनी चांगलं काम करून आपला पक्ष वाढवावा, असा सल्ला देखील रामदास आठवले यांनी यावेळी दिला आहे.

तर बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती. शिवसेना घालवण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जबाबदार असल्याचं देखील वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

‘काँग्रेस आता खिळखिळी झाली आहे. त्यांचे नेते भाजपमध्ये येत आहेत. माझ्या पक्षाला नागालँडमध्ये मान्यता मिळाली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी आता ‘एनडीए’ला साथ द्यायला हवी’ असंही आठवले म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT