Sharad Pawar and Navneet rana 
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांनी देखील मूर्मू यांना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या संपूर्ण देशाचं लक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे लागलं आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान तर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी प्रथमच राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत एक आदिवासी महिला उमेदनार असून त्या एनडीएच्या उमेदवार आहेत. द्रौपदी मुर्मू यांना भाजपने उमेदवारी दिली असून देशभरातील अनेक पक्ष त्यांना पाठिंबा दर्शवित आहे. महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात असलेल्या शिवसेनेने देखील त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्यांना पाठिंबा देण्याची मागणी झाली आहे. (Navneet Rana news in Marathi)

राष्ट्रवादी काँग्रेसने देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. नवनीत राणा यांनी म्हटलं की, शरद पवार महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. आदिवासींना आता सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. प्रथमच आदिवासींमधून एक महिला राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचल्या आहे. त्या भाजपच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या उमेदवार आहेत असा विचार न करता त्यांना पाठिंबा द्यावा. त्यांचा खडतर प्रवास लक्षात घ्यायला हवा असही राणा यांनी म्हटलं.

दरम्यान मुर्मू यांचे परिश्रम पाहून आणि आदिवासी समाजाला सर्वांच्या पाठिंब्याची गरज असल्यामुळे मी स्वत: शरद पवार यांना विनंती करते की, त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा द्यावा, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांना यशवंत सिन्हा यांचं आव्हान आहे. याआधीच अनेक प्रादेशिक पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे निवडणुकीत मुर्मू यांचं पारड जड दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT