Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Video: शरद पवारांचे पुन्हा पावसात भाषण... म्हणाले, "संघर्ष करु अन् धैर्याने पुढे जाऊ"

Sandip Kapde

Sharad Pawar: नवी मुंबईत नेरुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा व महिला बचत गट मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे स्वागत समारंभ थांबवून कार्यक्रमाला सुरुवात करण्याची विनंती शरद पवार यांनी केली.

यावेळी शरद पवार यांनी भरपावसात भाषण केले. शरद पवार म्हणाले, "आज अनेक महिलांनी अनेक चांगले स्टॉल उभे केले. मात्र पावसामुळे त्यांची निराशा झाली. माझ्या एक सांगणे आहे. निराशा हा विषय आपल्या मनामध्ये कधीही येता कामा नये. निराशेवर मात करु, संघर्ष करु अन् धैर्याने पुढे जाऊ. हा निर्धार आज आपण करुया."

साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभा पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार मित्र श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. या सभेमुळे निवडणुकीचा निकाल पालटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

शरद पवार साताऱ्यात असताना प्रचाराच्या भाषणावेळी धोधो पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यावेळीही शरद पवारांनी पावसाचा विचार न करता, आपल्या मित्रासाठी चक्क पावसात भाषण केलं आणि सभा गाजवली होती. यावेळी शरद पवार यांचे व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT