Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : केंद्रीय कृषीमंत्री पदाच्या ऑफरवर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले मी जाहीर..

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीत चलबिचल सुरू झाली होती. मात्र आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

शरद पवार म्हणाले की, भाजपकडून समाजात तेढ निर्माण कऱण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. हा मुद्दा आमच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित करण्यात येईल. यावेळी त्यांनी पुतण्या अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीवरही भाष्य केलं.

शरद पवारांना कृषीमंत्रीपद आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद आणि इतर काही ऑफर अजित पवारांद्वारे देण्यात आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कोणी काय विधान केलं ते मला माहित नाही. आमच्या गुप्त बैठकीत अशी कोणतीही चर्चा झाली नाही. भेट झाली होती. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझा सल्ला घेण्याची पद्धत आमच्या परिवारात आहे. त्यातून गैरसमज करून घेण्याचं कारण नाही, असंही पवार म्हणाले.

दरम्यान तुमच्या भेटीमुळे काँग्रेस आणि शिवसेना वेगळा फॉर्म्युला तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यावर पवार म्हणाले की, या केवळ चर्चा आहे. ही वस्तूस्थिती नाही. तुम्ही संजय राऊत यांचं निवेदन पाहिलं असेल. त्यात त्यांनीही सांगितलं की, या सगळ्या बाबी असत्यावर आधारित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT