Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: आजारपणामुळे फक्त चार मिनिटं बोलले पवार; वळसे पाटलांनी वाचलं भाषण

संतोष कानडे

शिर्डीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डी येथे मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शरद पवार यांनी आजारी असतांनासुद्धा या शिबिराला हजेरी लावली. पवार फक्त चारच मिनिटं बोलले. त्यांचं उर्वरित भाषण दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, उपचारानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये मी पुन्हा नियमित कामाला लागणार आहे. सध्या तब्येत ठीक नाही. त्यामुळे जास्त बोलू शकत नाही, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांचा आवाज खोल गेल्याचं जाणवलं.

यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांचं भाषण वाचून दाखवलं. यामध्ये शरद पवार यांच्या सुरुवातीच्या काळापासूनच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

शरद पवार आज शिर्डीला कार्यकर्ता शिबिरासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीमही होती. ही डॉक्टरांची टीम त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून राहतील.शरद पवार यांच्यासोबत डॉक्टर प्रतीक समदानी आणि त्यांचे काही सहकारी आहेत. शिर्डीहून परतल्यावर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS : अभिषेक शर्माची वादळी खेळी, मार्को यान्सेनचा 'वन हँड' कॅच... पंजाबचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले, बरेच काही घडले

Government Jobs: तब्बल २३ वर्षांनंतर मोठा बदल! महाराष्ट्रात ८,६६९ सरकारी पदांसाठी भरतीची घोषणा; अर्ज प्रक्रिया कधीपासून?

8th Pay Commission Salary Hike : आठवा वेतन आयोग लागू झाल्यास फरक मिळणार? कोणाला किती पगार वाढणार जाणून घ्या आकडेवारी

SRH vs PBKS Live: अभिषेक शर्माची क्रांती! IPL मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रम केला; वैभव सूर्यवंशी या विक्रमात पाचव्या क्रमांकावर

Yuzvendra Chahal पुन्हा वादात! कार चालवत असतानाच रस्त्यात फेकली सिगारेट अन् मग... Video Viral

SCROLL FOR NEXT