Sharad Pawar Tested Corona Positive sakal media
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह! काळजी न करण्याचं आवाहन

संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेऊन योग्य ती काळजी घेण्याचं केलं आवाहन

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण काळजीचं काही कारण नसल्यांच त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनंही त्यांनी केलं आहे. (Sharad Pawar Tested Corona Positive)

पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. डॉक्टरांनी सूचवल्याप्रमाणं मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले असतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी"

दरम्यान, साधारण महिन्याभरापूर्वी २९ डिसेंबर २०२१ रोजी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

फडणवीसांकडून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT