Sharad Pawar In Dhule esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : तिकीट नाकारलेल्यांनी बारामतीची चर्चा करु नये; पवारांचा बावनकुळेंना टोला

मिलिंद संगई, बारामती

Sharad Pawar : ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळत नाही, तिकीट देण्यायोग्य आहेत अस वाटत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याच काही कारण नाही अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

पुणे व बारामतीची जागा भाजपच जिंकणार असा बावनकुळेंकडून सातत्याने उल्लेख केला जातो, या बाबत बारामतीत रविवारी माध्यमांनी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. हेच अधोरेखीत केले. बारामती राज्य व देशालाही माहिती आहे. केवळ बातमी व्हावी हाच त्यांचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

भाजपला लोकच बाजूला करतील..

आज देशात सत्तर टक्के ठिकाणी भाजप नाही, ज्या ठिकाणी निवडणूका होत आहेत, तेथील कौल विचारात घेता भाजपला मतदारच बाजूला करतील असे चित्र आहे. बदल व्हायला हवा ही मतदारांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रश्न सुटला तर आनंद....

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला तर त्याचा आनंदच होईल, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारने वेळ मागून घेतला आहे, सरकार नेमके काय करणार या कडे पाहावे लागेल, दोन दिवसानंतर सरकार काय निर्णय घेणार ही बाब महत्वाची आहे.

सर्वांचेच इंडीया आघाडीत स्वागत...

इंडीया आघाडीत जे सहभागी होतील, त्या सर्वांचेच स्वागत आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या सोबतची बैठक राजकीय नव्हती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'प्रॉब्लेम ऑफ रुपीज' या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्या कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT