sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ''आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात काही होईल...'' शरद पवारांच्या विधानाची राज्यात चर्चा

संतोष कानडे

मुंबईः मुंबईतल्या वाय.बी. सेंटरमध्ये आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी एक विधान केलं आणि त्याची चर्चा सुरु झाली. या कार्यक्रमाला राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.

वाय.बी. सेंटरमध्ये सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती. शरद पवार बोलतांना म्हणाले की, आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात काही होईल.

शरद पवार बोलतांना म्हणाले की, धुळ्यामध्ये सुरु असलेल्या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. सध्या राज्य सरकारशी बोलणं अडचणीचं आहे. परंतु त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल. ज्यावेळी मार्ग निघेल त्यावेळी राज्य सरकारला मदत करायला भाग पाडलं जाईल.

काय म्हणाले शरद पवार?

मी, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, आम्ही ठरवलं तर महाराष्ट्रात काही होईल. यापेक्षा वेगळं काही सांगायची गरज नाही. राजकीय गोष्टींपेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या संस्था आणि त्यांच्याकडील खजिना जतन केला पाहिजे. त्यासाठी सरकारने या संस्थांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

वि.का. राजवाडे संशोधन मंडळातर्फे ग्रंथ प्रकाश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या उपक्रमाबद्दल बोलतांना शरद पवार म्हणाले की, हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. मी काही पुस्तक वाचली असून काही पुस्तक चाळली आहेत. अभ्यासपूर्ण रितीने लिहिलेली ही पुस्तकं आहेत.

दरम्यान, राज्याचं राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर आहे. शिवसेना पक्षातून फुटून बाहेर पडलेला गट भाजपसोबत गेला आहे. तर राष्ट्रवादीमधूनही एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेला आहे. या आघातानंतर शरद पवारांनी खचून न जाता बाहेर पडून पुन्हा संघर्ष करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पवारांच्या आजच्या विधानाची चर्चा सुरु झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांवर जलसंकटाचे सावट! पाणीकपातीत वाढ होणार, पालिकेचा मोठा निर्णय; कधीपासून आणि का?

Video: बापरे! बनावट दुधाचा तलाव बघितला का? शेकडो टँकर्स केले रिकामे; व्हिडीओ नेमका कुठला?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : ऑगस्ट २०२७पर्यंत पिण्याचं पाणी सुरक्षित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Pune News : शुल्कनिश्‍चितीनंतरही प्लंबरकडून नळजोडासाठी लूट सुरुच; महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नाही

SCROLL FOR NEXT