Uddhav Thackeray And Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांनी CM पदाच्या चेहऱ्याचा प्रश्न एका वाक्यात संपवला

Uddhav Thackeray: यामध्ये शरद पवार यांनी लोकसभा निवडणुका, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, भाजप, राहुल गांधी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दलच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

आशुतोष मसगौंडे

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कालपासून विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली.

यामध्ये शरद पवार यांनी लोकसभा निवडणुका, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, भाजप, राहुल गांधी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दलच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील का? या प्रश्नाचेही पवारांनी उत्तर दिले.

यावेळी पवार म्हणाले की, "आम्ही सामुहिकपणे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे."

दरम्यान काल संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते की, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा चेहर असायला हवा. त्याशिवाय निवडणुकांना कसे जायचे." त्यानंतर आज शरद पवार यांनी स्पष्ट केले केले की, महाविकास आघाडी सामुहिकपणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल.

पुढे पवारांना विचारण्यात आले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात का? त्यावर पवार म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत आम्ही सामुहिकपणे मुख्यमंत्री पदाचा चेहर असू."

यावेळी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेससह छोट्या पक्षांनाही संधी देणार असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत आम्ही तीन प्रमुख पक्ष लढलो पण त्यामध्ये महाविकास आघाडीला आप, शेकाप आणि अनेक डाव्या नेत्यांनी मदत केली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांनाही संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत."

शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अनेक टोले लगावले. ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत मोदींची गॅरंटी फेल गेली. त्यांनी महाराष्ट्रात जिथे सभा घेतल्या तिथे जवळपास सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्यावात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: आनंदाची बातमी! भारतीय रेल्वेकडून तीन नव्या गाड्यांची घोषणा; कसा असणार मार्ग?

Yashwant Factory: यशवंतची धुराडी कधी पेटणार?: 'जमीन-विक्री प्रकरणात उच्च न्यायालयात बहुतांश प्रतिवादी अनुपस्थित'; 'तारीख पे तारीख'

Side Effects Smartphone Overuse: तुम्हीही स्मार्टफोनचा अतिवापर करता का? जाणून घ्या 'हे' गंभीर परिणाम आणि उपाय!

Ahilyanagar News: कांदा लिलावात शेतकऱ्यांचा एल्गार! 'अहिल्यानगर हमाली दरवाढीचा विषय'; पाच तास लिलाव बंद

Mahadevi Elephant: 'महादेवी हत्तीसाठी मंगळवेढा-कोर्टी सायकलवारी'; हत्तीची प्रतिकृती ठरली लक्षवेधी ठरली

SCROLL FOR NEXT