Sharad Pawar VS Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादी कोणाची? आज होणार सुणावणी; शरद पवार गटाकडे अधिकचे शपथपत्र; मात्र..

Chinmay Jagtap

Ajit Pawar Vs Sharad Pawar : शिवसेनेनंतर आता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीपक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं? याविषयी पहिली सुनावणी पार आज पडणार आहे. यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल आहे.

शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत. यावेळी या गटाकडून सात ते नऊ हजार शपथपत्र दाखल करण्यात आले आहेत. दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी होणार आहे.

काल शरद पवार गटाकडून या संदर्भात दिल्लीत कार्यसमितीची एक बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत जर निवडणूक चिन्ह गोठवलं तर पुढची रणनीती काय असेल? याविषयीची चर्चा झाली.

दरम्यान अजित पवार गटापेक्षा शरद पवार गटाने दिलेल्या शपथपत्रांची संख्या जास्त आहे. अजित पवार गटाने काही मृत व्यक्तींची नावे शपथपत्र सादर केली आहेत असे शरद पवार गटाचे म्हणणे आहे. याच बरोबर त्या शपथ पत्रांमध्ये 60 सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्याचबरोबर अजित पवार गटाने सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये 98 पत्र हे शिक्षक संस्थांच्या कर्मचाऱ्यांची आहेत. असा दावा शरद पवार गटाने केला आहे. अजित पवार गटापेक्षा शरद पवार गटाची शपथपत्रे ही 4000 हून जास्त असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या सुनावणीला दोन्ही गटाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र दुसऱ्या फळीतील नेते या ठिकाणी उपस्थित असण्याची शक्यता आहे. पहिल्या सुनावणी वेळी नक्की काय होतं ? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

SCROLL FOR NEXT