Ajit Pawar vs Sharad Pawar and Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar vs Sharad Pawar : बारामतीत अजित पवारांविरोधात उमेदवार देणार का? शरद पवार म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी आज पक्षात बंड घडवून आणत सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत जावून सरकारमध्ये सामील झाली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र हे बंड शरद पवारांना दूर ठेवून घडवून आणण्यात आल्याचं समोर आलं. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या सर्व प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्यासाठी हे नवीन नाही. मोदी म्हणतात राष्ट्रवादी भ्रष्ट झालेला पक्ष मात्र त्याच राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांनी सत्तेत घेतले. आजचा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही. महाराष्ट्रातील जनतेवर माझा प्रचंड विश्वास आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार संपर्कात आहेत. ज्यांनी पक्ष सोडला त्यांच्यापैकी ३-४ जण सोडून सर्व पराभूत होतील, असे शरद पवार म्हणाले.

अजित पवार यांनी पक्षावर दावा केला. यावर शरद पवार म्हणाले, "कुणाला काय दावा करायचा आहे त्यांनी करावा. मला काही फरक पडत नाही. आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू. त्यांना इतिहास नीट माहित नाही. राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला कसा. हा पक्ष नव्हता, आमच्या भूमिका आणि काँग्रेससोबत काही मतभेद होते. त्यामुळे आम्ही हा पक्ष निर्माण केला. पहिला पक्ष कुणी नेला असेल पण त्याचा परिणाम आमच्यावर होणार नाही." (Ajit Pawar ncp news)

यावेळी शरद पवार यांनी विचारण्यात आले की, बारामतीतून अजित पवार यांच्याविरुद्ध उमेदवार देणार का? त्यावर शरद पवार म्हणाले की, निवडणुकीला आणखी एक वर्ष शिल्लक आहे. उमेदवार कोण असेल हे तेव्हा ठरवू, आता काय सांगणार, असा प्रतिप्रश्न पवार यांनी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT