sahrad Pawar and Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : आम्ही थेट, तर शरद पवार गनिमी काव्याने लढतायत; उद्धव ठाकरे गटाचं सूचक विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर दोन्ही गटाकडून सावध प्रतिक्रिया देण्यात येत होत्या. मात्र कोल्हापूरमधील सभेत शरद पवार गटाने अजित पवार गटावर कठोर शब्दांत हल्ला केला. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी कठोर शब्दात अजित पवार गटाला पहिल्यांदा गद्दार म्हटलं. या टीकेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादात पडायचं नाही. मात्र शरद पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कोल्हापुरात जी सभा घेतली आणि बेईमानांवर हल्ला केला तो जबरदस्त होता. मी त्याला त्याला महत्त्व देतो.

अजित पवार हे कोणाचे नेते आहेत हे माहित नाही. अजित पवारांना सध्या अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मानावं लागत आहे. मात्र शरद पवार हे भारतीय जनता पार्टी बरोबर कधीच जाणार नाही. महाराष्ट्र ही युद्धांची भूमी आहे. इथं मैदानावरचं आणि गनिमी काव्याने अशी दोन प्रकारे युद्ध लढली गेली आहेत.

आम्ही मैदानात उतरून युद्ध करत आहोत. शरद पवारांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तो म्हणजे गनिमी काव्याचा. शरद पवार त्यांच्या पक्षातील लोकांशी गनिमी काव्याने लढत आहेत. तर आम्ही शस्त्र वापरून हे युद्ध लढत आहोत दोन्ही युद्धात आम्हाला यश येईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरच्या सभेत अजित पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना थेट गद्दार म्हटलं होतं. गद्दारी काही लोकांच्या रक्तातच असते, ते आता महाराष्ट्राला दिसत आहे. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायतान प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा सल्ला आव्हाडांनी दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT