Bachchu Kadu  
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu : शरद पवारही अजित पवारांसोबत येऊन महायुती मजबूत करतील; बच्चू कडू यांच विधान

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News- दोन दिवसांपूर्वी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या गुप्त भेटीवरून चर्चांना उधाण आलं आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बच्चू कडू म्हणाले की, शरद पवारांचं बोलण आणि त्यांची कृती या न समजणाऱ्या गोष्टी आहेत. शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाही ते करतात.

बच्चू कडू म्हणाले की, शरद पवार यांनी प्रचंड राजकीय अनुभव आहे. त्यामुळे काय समजावं हेच समजत नाही. राष्ट्रवादी पक्ष सध्या संभ्रमात दिसत आहे. राष्ट्रवादीत अनिश्चितता आहे. पिक्चरमध्ये कोणी येत नाही. अजित पवार बाहेर पडल्यानंतर जो विरोध व्हायला पाहिजे होता, तो दिसत नाही. अजित पवारांच्या बॅनरवर पवारांचे फोटो वापरले जाताच. या सगळ्या परिस्थितीमध्ये संभ्रम दिसत आहे.(Latest Marathi News)

दरम्यान शरद पवारांच्या कृती न समजणाऱ्या आहेत. मात्र सध्याच्या घडामोडींवरून शरद पवार देखील अजित पवारांसोबत येऊन महायुती मजबूत करतील, असा अंदाजही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार भेटीमुळे विरोधकांनी तयार केलेल्या आघाडीत मतभेद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य काँग्रेसकडून शरद पवार आणि अजित पवार भेटीची माहित राहुल गांधींनी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

ITI Students: आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आता वैदिक संस्कार अभ्यासक्रम; नेमकं काय शिकायला मिळणार?

साईबाबांनी स्वप्नात दर्शन देताच दूर झाला बॉलिवूड अभिनेत्रीचा रोग ! 'या' दिग्दर्शकाच्या होती प्रेमात

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

SCROLL FOR NEXT