Sharad Pawar will attend farmers meeting at Kapsevadi in Madha Lok Sabha constituency on November 16  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : शरद पवार दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकरी मेळाव्याला राहणार उपस्थित

शेतकऱ्यांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे भेटुन शरद पवारांसमोर याबद्दलची व्यथा व्यक्त केली

रोहित कणसे

राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरून शरद पवार आणि अजित पवार गट याच्यात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर संघर्ष सुरु आहे. यादरम्यान दोन्ही गटांमधील नेत्यांकडून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे केले जात आहेत. यादरम्यान दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचणार आहेत. पवार हे 16 नोव्हेंबर रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील कापसेवाडीत शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

सोलापूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. सध्या या तिन्ही जिल्ह्यात बेदाणा, दूध आणि टॉमॅटोचा प्रश्न ऐरणीवर आहेत. या पार्श्वभूमिवर शरद पवारांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.

राज्यात 2 लाख 57 हजार टन बेदाण्याचे उत्पादन घेतले जाते यातील तब्बल 94 हजार टन बेदाणा योग्य दर मिळत नसल्याने अजुनही कोल्ड स्टोरेज मध्ये पडून आहे. तसेच शेतकऱ्यांची बेदाण्यावरील निर्यात शुल्क कमी करुन आयात शुल्क वाढवण्याची मागणी उत्पादकांकडून केली जात आहे.

शेतकऱ्यांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे भेटुन शरद पवारांसमोर याबद्दलची व्यथा व्यक्त केली, यानंतर शरद पवार यांनी तातडीने कापसे वाडी येथील मेळाव्याला येण्याचं मान्य केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT