Sharad Pawar will decide for the post of President based on his strength
Sharad Pawar will decide for the post of President based on his strength Sharad Pawar will decide for the post of President based on his strength
महाराष्ट्र

संख्याबळ पाहून राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार निर्णय घेतील; पक्षाकडून स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत शरद पवार (Sharad Pawar) निर्णय घेतील. जेव्हा विरोधी पक्षांकडे जिंकण्यासाठी पुरेशी संख्या असते तेव्हा, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. (Sharad Pawar will decide for the post of President based on his strength)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या संयुक्त रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी (ता. १५) दिल्लीत बैठक बोलावली आहे. बैठकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरील प्रतिक्रिया आली आहे. ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली, हे विशेष...

पवार साहेब भारताचे राष्ट्रपती झाले तर प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून जाईल यात शंका नाही. परंतु, आमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे का, हा प्रश्न आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीत सीपीएमचे सीताराम येचुरी आणि सीपीआय प्रमुख डी राजा यांचीही भेट घेतली. शरद पवार उमेदवार होण्याच्या कल्पनेबद्दल उत्साही नव्हते. आमची समजूत अशी आहे की त्यांना स्वारस्य नाही. त्यांच्याकडे अनेक राजकीय बांधीलकी आहेत, असे शरद पवार म्हणाल्याचे डी राजा यांनी सांगितले.

शरद पवार नाव कोणी सुचविले?

शरद पवार यांचे नाव दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सुचविले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. शरद पवार यांनी आयुष्यात एकही निवडणूक हरलेली नाही. त्यामुळे आवश्यक संख्याबळ असल्यास ते आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतील, असेही भुजबळ म्हणाले.

प्रोटोकॉल फारसा आवडत नाही

शरद पवार यांना राष्ट्रपती (Presidential Election) किंवा राज्यपाल होऊन एका जागी बसणे आवडणार नाही. त्यांना प्रोटोकॉल फारसा आवडत नाही. त्यांना खेड्यात लोकांना भेटायला, शेतकऱ्यांसोबत शेतात बसायला आवडते, असे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी ते हिंदूंशी लढले अन् आता ख्रिश्चनांशी... PM Modi यांनी रविवारच्या सुट्टीवरून कोणावर साधला निशाना?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील पार्किंगमध्ये अनेक गाड्या जळून खाक

Jackfruit Worst Combination : फणस खाल्ल्यानंतर 'या' गोष्टींचे सेवन करणे टाळा, अन्यथा पचनाच्या समस्यांना मिळेल आमंत्रण

Manoj Jarange : पुन्हा उपोषणावर मनोज जरांगे ठाम

Share Market Opening: शेअर बाजार लाल रंगात उघडला; बँक निफ्टी 48,900च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT