Yashomati Thakur  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Yashomati Thakur : ''शरद पवार भाजपसोबत गेले तर...'' काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?

संतोष कानडे

मुंबईः अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. त्यांचं कारण मागच्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी आणि विरोधाभासी विधानं.

यातच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांबद्दल एक विधान केलं आहे. शरद पवार जर भाजपसोबत गेले तर काय होईल? यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

सुरुवातीला महाविकास आघाडीबद्दल बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महाविकास आघाडीला फ्युचर आहे. येणाऱ्या काळात महाविकास निवडून येईल. भारतात इंडियाच निवडून येणार आहे.

यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, सार्वजनिकरित्या महाराष्ट्रातील घडामोडी बघितल्या तर मूळ शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि मूळ राष्ट्रवादी ही शरद पवार यांची आहे.जी लोकं बाहेर गेली ती संविधानिकदृष्ट्या अपात्र आहेत.

''इलेक्शन कमिशन काय निर्णय घेईल? हे आधीपासून माहित आहे. सरकारची एजन्सी म्हणून ते काम करत आहेत. भाजपमध्ये दम राहिला नाही म्हणून ह्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे आम्ही यांचा निषेध करतो.''

शरद पवारांचं कालचं विधान आणि अजित पवारांसोबतची गुप्त बैठक यावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, शरद पवार या वयामध्ये, अशा परिस्थितीमध्ये मला वाटत नाही त्यांच्या मूळ विचारधारेपासून दूर जाऊन बीजेपी सोबत बसतील. पण ते जर गेले तर त्यांच नुकसान होईल, असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेबद्दल रोखठोक भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT