Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde rebel : शरद पवारांच्या पट्टशिष्याला शिंदेंच्या बंडाची कल्पना होती, सूरतला जाण्यासाठी केली मदत?

उद्धव ठाकरेंचा घात एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादीची साथ

अंकिता खाणे (Ankita Khane)

सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याची सुरवात तब्बल 380 दिवसांपूर्वी झाली होती अशी खळबळजनक माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा 16 आमदारांसह सुरतला गेले, त्या 20 तारखेच्या मध्यरात्री आमदारांच्या प्रवासाची इत्यंभूत माहिती राज्याच्या गुप्तचर खात्याने तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली होती. पण त्यानंतरही एकनाथ शिंदे आपल्या 16 समर्थक आमदार यांच्यासह महाराष्ट्रचं नाही तर पुढे गुवाहाटी मार्गे आधी गोवा त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मंत्री असा प्रवास पुर्ण झाला. (Latest Marathi News)

जर एकनाथ शिंदे यांची संपुर्ण माहीती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राज्याच्या गुप्तचर खात्याने दिली होती. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून लपवली का? आणि लपवली असेल तर का लपवली, की त्यांना कोणी ती माहिती लपवायला सांगितली होती, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.(Latest Marathi News)

या संपूर्ण घटनेवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हेतुवर शंका उपस्थित केली आहे. आव्हाड बोलताना म्हणाले की. मला शंका येत आहे की, त्यांना सर्व माहिती होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी लागणारी मदत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली असेल. त्यांनी काय केलं त्यांच्या मनाला माहिती, पोलिस संपूर्ण माहिती गृहमंत्र्यांना देत असतात, इतकी मोठी माहीती पोलिस लपवणार नाहीत असंही आव्हाड म्हणालेत.(Latest Marathi News)

दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या जवळचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यक पदापासून तर अनेक कॅबिनेट मंत्रिपदांपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. याच वळसे पाटलांनी आज शरद पवारांचे भाषण वाचून दाखवले आहे. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांनी इतकी महत्वाची माहिती लपवल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT