Sharad Pawar's comment on Raj Thackeray's ultimatum  Sakal
महाराष्ट्र बातम्या

भोंग्यांबाबत राज ठाकरेंच्या अल्टिमेटवर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले...

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत दिलेल्या अल्टीमेटमवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले.

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत दिलेल्या अल्टीमेटमवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. मुंबईतील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज ठाकरेच्या या वक्तव्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल.

"महागाई, विकास इ. प्रश्नावरून लक्ष भरकटवण्यासाठी देशात धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. देशात सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांप्रदायिक विचाराला प्रोत्साहन देण्याचं चित्र सध्या दिसत आहे. लोकांनी याला बळी पडू नये', असंही शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (Sharad Pawar's comment on Raj Thackeray's ultimatum)

राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यादिवशी मशिदींवरील भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेवर ठाम आहेत. मशिदीवरील भोंगा हा धार्मिक नसून सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून मागे हटणार नसल्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली. या विषयावर बोलताना काल राज ठाकरे म्हणाले होते की, "मशिदिवरचे भोंगे काढा हे मी आधिच सांगितंल होतं. याचा देशाला त्रास होतोय. हा धार्मिक विषय कुठं आहे, प्रार्थना तुमची आहे आम्हाला कशाला ऐकवताय. तुम्हाला सांगून जर कळत नसेल की आम्हाला त्रास देऊ नका, तर तुमच्या मशिदी बाहेर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार. देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही." असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

दरम्यान आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या या अल्टीमेटमवरील प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकार याबाबत गांभीर्याने विचार करेल, असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट २’वर पुन्हा वाद! काश्मिरी पंडित-बिहाऱ्यांवरील विनोद समय रैनाला भोवणार; भाजपकडून कारवाईची मागणी

Nepal Flood : पुण्यातील ८ नागरिक सुखरूप; तर एक जण बेपत्ता

Everest च्या हिंगच्या विक्रीवर तात्काळ बंदी! FSSAI च्या तपासणीत सॅम्पल फेल, आणखी एका कंपनीवरही कारवाई

Neeraj Chopra २०२६ वर्षात आता पुन्हा मैदानात दिसणार नाही, स्वत:च सांगितलं कारण; Asian Games आधी भारताला धक्का

Education Leader Passes Away: शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन; विद्यार्थी चळवळ व राज्य शिक्षण धोरणात मोठे योगदान

SCROLL FOR NEXT