Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

अपेक्षाभंग झाल्यानंच भाजप महाआघाडीवर दबाव आणतंय: शरद पवार

सामाजिक ऐक्य संकटात येऊ नये हीच मला चिंता आहे आणि प्रश्न सोडवणे ही आपली परंपरा आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

सामाजिक ऐक्य संकटात येऊ नये हीच मला चिंता आहे. प्रश्न सोडवणे ही आपली परंपरा आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. समाजिक ऐक्य संकटात येऊ नये हीच चिंता मला आहे. आज जळगाव येथे विविध विषयांवर भाष्य करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले, "राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मार्गाने जात असताना दिसत आहेत. एखादी व्यक्ती सोडली तर असं राजकारण करा, असं म्हणणारा मला पक्ष मला दिसत नाही. राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मार्गाने जाण्याचं ठरवलं आहे, त्यांची भुमिका त्यांनी घ्यावी मात्र त्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ नये, याची काळजी घ्यावी." (Sharad Pawar's criticism of Raj Thackeray and BJP: Social unity should not be endangered)

एखादी टोकाची भुमिका घेऊन पुढे जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला केंद्रातील पक्षाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन द्यावे याची काळजी वाटते. यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येईल की काय याची चिंता वाटते. काहीही झालं तरी महाराष्ट्र एकसंध ठेवला पाहिजे, सर्व धर्म, जाती, भाषा यांमध्ये सामजस्य असले पाहिजे. याला पोषक भुमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यापासून दूर जाऊ की काय अशी परिस्थिती आहे.

देशात सध्या केंद्र सरकारच्या एजन्सीचा वापर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. केंद्रातील पक्षाला काहीही करून येथील सत्ता हवी आहे. परंतु त्यांचा अपेक्षा भंग झाला. त्यामुळे येथे हस्तक्षेप करून येथील सत्ता हातात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते राज्य ताब्यात कसं घेता येईल यामागे भाजपा लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

राज्य ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. भाजपचा राज्यात अपेक्षाभंग झाला आहे म्हणूनच महाविकास आघाडीवर दबाव आणत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अज्जू रडवलंस यार..! अजिंक्य रहाणे निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना रडला, Video Viral

Ajinkya Rahane Retirement: भारतीय क्रिकेटला मोठा धक्का; माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Viral Video : "बहि‍णींची काळजी घे, आईला दुखवू नकोस..." मृत्यूच्या दारात असलेल्या वडिलांचा चिमुकल्याला शेवटचा संदेश, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेच्या कारवाईला FDA कर्मचारी वैतागले, थेट मंत्र्यांकडेच तक्रार; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT