Sharad Pawar and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ...तर खारघर घटनेची वस्तूस्थिती समोर येणार नाही, त्यामुळे...; शरद पवारांची मागणी

रवींद्र देशमुख

मुंबई - खारघर इथं महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला होता. यावरुन सध्या राज्यातलं वातावरण तापलेलं आहे. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमली आहे. आता या खारघर दुर्घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम धर्माधिकारींच्या संस्थेने आयोजित केलेल नव्हता. महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. तिथे निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले. केवळ राज्य सरकारने खबरदारी घेतली नसल्याने हे घडलं. प्रचंड उन्हाळा असताना उघड्यावर कार्यक्रम घेतल्याचं पवार म्हणाले.

आजच्या कार्यक्रमात आपण उत्तम पेंडॉल टाकला. पक्षाला असा कार्यक्रम घेणं शक्य आहे, तर मग सरकारला घेणं का शक्य नव्हतं. या निष्काळजीपणाची चौकशी झाली होती. या घटनेची सिटींग हायकोर्टाच्या न्यायामूर्तीच्या माध्यमातून चौकशी व्हायला हवी, असं पवार यांनी नमूद केलं.

पवार पुढं म्हणाले, की सरकारने एका अधिकाऱ्याची समिती स्थापन केली आहे. तो अधिकारी स्वच्छ कामासाठी परिचीत आहे. मात्र सरकारी अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो बॉसला रिपोर्ट करत असतो. त्यामुळे यातून सत्य परिस्थिती पुढं येऊ शकणार नाही. त्यासाठी राज्य हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांकडे चौकशीची जबाबदारी सोपविली पाहिजे, आणि वस्तूस्थिती देशासमोर आणली पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT