sharad pawar sakal media
महाराष्ट्र बातम्या

Patra Chawl : पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच नाव अतुल भातखळकर यांनी घेतलं होतं

सकाळ डिजिटल टीम

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच नाव अतुल भातखळकर यांनी घेतलं होतं. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना चौकशी करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास काय कराल असा सवाल राज्य सरकारला शरद पवार यांनी केला आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. पण, जर आरोप खोटे ठरले तर काय कराल हे ही सरकारने स्पष्ट करावं असंही पवार म्हणालेत.

पत्राचाळ घोटाळा नवीन खुलासे होत असतानाच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी काल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. अतुल भातखळकर यांनी ही मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते, असेही भातखळकर यांनी म्हटलं होतं. याबाबत पत्र लिहून पत्राचाळ घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भातखळकर यांनी केली होती.

तसेच अतुल भातखळकर यांनी यासंबधी एक ट्वीट देखील केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, ED च्या आरोपपत्रात हे नाव आहे. One and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी काल केलं होतं .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT