Sharad Ponkshe Rahul Gandhi Sakal
महाराष्ट्र बातम्या

त्याला 'गोळवलकर' म्हणताही येईना; शरद पोंक्षेंचा राहुल गांधींना टोला

सावरकरांची दहशत काँग्रेसला माहित आहे, असं विधान शरद पोंक्षेंनी केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेते शरद पोंक्षे आपल्या राजकीय भूमिकांमुळे आणि विधानांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आताही राहुल गांधींबद्दलच्या एका विधानामुळे पोंक्षे चर्चेत आले आहे. ५० वर्षांचा झाला तरी त्याला गोळवलकर म्हणता येत नाही, असा टोला शरद पोंक्षेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींना लगावला आहे.

पुण्यातल्या मृत्यूंजय सावरकर या कार्यक्रमात बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, महाराष्ट्रातलं गोळवलकर विद्यालय एकच का? सगळ्या राज्यांमध्ये असं विद्यालय असायला हवं. सावरकरांचे विचार लहान मुलांमध्ये भिनायला हवेत. इथल्या लहान मुलांनाही सावरकरांबद्दल कळतं. मुलामुलांमध्ये फरक आहे. ही मुलं पाहा आणि दिल्लीतला तो मुलगा पाहा. ५० वर्षांचा घोडा झाला तरी त्याला गोळवलकर म्हणता येत नाही. आता पन्नाशी आली तरी म्हणता येत नाही.

सावरकरांचे विचार शाळांमध्ये पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचंही पोक्षेंनी सांगितलं. ते म्हणाले, माझे जवळचे स्नेही मुख्यमंत्री झालेत. त्यांना सांगेन मी, सावरकर विचार राज्यात शाळेत पोहविण्यासाठी मी प्रयत्न करेन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना शरद पोंक्षे म्हणाले की, सावरकरांबद्दल वाट्टेल ते बोलतात. सावरकरांवर आक्षेप घेणारे खूप आहेत. उत्तर देणारे कमी आहेत. सावरकर समजत नाहीत म्हणून त्यांना विरोध केला जातोय. सावरकरांचा देशात जेवढा अपमान झालाय तेवढा कोणीच केला नसेल. सावरकर नावाची दहशत किती आहे, ते काँग्रेसला माहित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT