Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांची निवृत्तीची घोषणा, कार्यकर्त्यांचा गोंधळ; अजित पवार काय म्हणाले? | Sharad Pawar Resigns

दत्ता लवांडे

मुंबई : शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या "लोक माझे सांगाती" या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल यासाठी एक समिती नेमण्यात येणार असून समितीच्या निर्णयानुसार पुढचा अध्यक्ष ठरवण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची आणि निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या" अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या आहेत.

या सर्व गोंधळानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला असून "अध्यक्षपदाच्या निवृत्तीसंदर्भात समिती जो काही निर्णय घेईल तो शरद पवार यांना मान्य असेल, त्यामुळे तुम्ही आता गोंधळ करू नका" असं अवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्याचबरोबर या समितीमध्ये राष्ट्रवादीचेच नेते, सदस्य असणार आहे. त्यामध्ये मी, सुप्रिया सुळे या सुद्धा असतील, तुम्ही जी काही भावनिक साद साहेबांना घातली आहे ती साहेबांच्या लक्षात आली आहे. त्यानुसार कमिटी योग्य ते निर्णय घेईल असं अजित पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT