traffic police  sakal
महाराष्ट्र बातम्या

भरधाव रुग्णवाहिकेच्या आडवी आलेली ‘ती’ थोडक्यात वाचली! सोलापूरच्या सरस्वती चौकातील प्रकार; वाहतूक पोलिस होते, पण चौकापासून लांब वाहने अडविण्यात व्यस्त

सकाळी अकराची वेळ, सिग्नल पडलेला, मागून सायरन वाजवत रुग्णाला घेऊन भरधाव वेगाने आलेली रुग्णवाहिका, सिग्नलला अस्ताव्यस्त थांबलेल्या वाहनचालकांनी बाजूला होत रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून दिली, पण समोरच एक महिला बिनधास्तपणे सिग्नल ओलांडताना मोबाईलवर बोलत निघाली. रुग्णवाहिका भरधाव होती आणि ती महिला आडवी आली.

तात्या लांडगे

सोलापूर : सकाळी अकराची वेळ, सिग्नल पडलेला, मागून सायरन वाजवत रुग्णाला घेऊन भरधाव वेगाने आलेली रुग्णवाहिका, सिग्नलला अस्ताव्यस्त थांबलेल्या वाहनचालकांनी बाजूला होत रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून दिली, पण समोरच एक महिला बिनधास्तपणे सिग्नल ओलांडताना मोबाईलवर बोलत निघाली. रुग्णवाहिका भरधाव होती आणि ती महिला आडवी आली. पण, प्रसंगावधान साधून रुग्णवाहिका चालकाने जोरात ब्रेक मारला आणि ती महिला क्रॉस झाली, ‘काळ आला होता पण वेळ नव्हती’ असेच सर्वजण म्हणाले. हा प्रकार आहे सरस्वती चौकातील.

सोलापूर शहरातील वाहतूक पोलिसांचा विभाग नेहमीच विविध कारणांवरून चर्चेत राहिला आहे. कधी टोईंग वाहन तर कधी निर्बंध असतानाही बिनधास्तपणे चालणारी अवजड वाहतूक, अर्ध्या किमी अंतरावरच चार ठिकाणी थांबलेले वाहतूक पोलिस आणि दुसरीकडे वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कोणीच नाही, अशीही स्थिती पाहायला मिळते. वाटेत कोठेही दोन दोन करून थांबलेले वाहतूक अंमलदार रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना मध्यभागी जावून बाजूला घेतानाही दिसतात. आता नवीन प्रकार सुरू असून नेमके सिग्नलवरच वाहनांना बाजूला घेऊन कारवाई केली जात आहे.

दरम्यान, शहरातील सिग्नल दुपारी बारापर्यंत सुरू असतात. रविवारी (ता. २३) सकाळी अकराच्या सुमारास सरस्वती चौकात सिग्नल सुरू आहे, पण एकही वाहतूक अंमलदार त्याठिकाणी नव्हता. चौकातून हाकेच्या अंतरावर मात्र दोन वाहतूक अंमलदार पुढे जावून सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांना बाजूला घेऊन कारवाई करीत होते. त्यामुळेच रुग्णवाहिकेच्या धडकेत सिग्नल लागलेल्या चौकातून फोनवर बोलत जाणाऱ्या महिलेला प्राण गमवावे लागले असते. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सिग्नल शिस्तीसाठी की वाहनांना अडवून कारवाईसाठी?

शहरातील सिग्नल यंत्रणा १२ ते १४ वर्षांपूर्वीची जुनाट असून अनेक सिग्नलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होतो, अशी स्थिती आहे. पण, सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत सिग्नल सुरू असतात आणि विशेष बाब म्हणजे त्यावेळी सिग्नलवर वाहतूक पोलिस दिसत नाहीत. ज्या चौकात सिग्नल लागलेला आहे, त्या काही चौकात वाहतूक पोलिस दिसतात पण वाहतूक नियमनसाठी नव्हे तर सिग्नलवर थांबलेल्या वाहनांवर कारवाई करताना दिसतात. तर अनेक अंमलदार मोबाईलवर एका कोपऱ्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळतात. अशा गंभीर बाबींकडे पोलिस आयुक्त एम. राज कुमार लक्ष देतील का, असा प्रश्न सोलापूरकर विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT