Sheena Bora Murder Case esakal
महाराष्ट्र बातम्या

Photo: शीना बोरा हत्याकांड; इंद्राणी मुखर्जीला जामीन, पाहा काय आहे प्रकरण

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला असून आज मुखर्जीची भायखळा तुरुंगातून सुटका झाली आहे.

दत्ता लवांडे

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला असून आज मुखर्जीची भायखळा तुरुंगातून सुटका झाली आहे. तिला विशेष सीबीआय कोर्टातून दोन लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी ती गेल्या साडेसहा वर्षांपासून कारागृहात आहे.
२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली.
इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि चालक शामवर राय यांनी मिळून इंद्राणीची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिची हत्या केली आणि रायगड जिल्ह्यात एका अज्ञात स्थळी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.
२०१५ मध्ये ही घटना उघडकीस आल्यावर कळलं की इंद्राणीने शीनाची गळा दाबून हत्या केली होती आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. २०२० मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरू असताना पीटर आणि इंद्राणी यांनी घटस्फोट घेतला.
शीना बोरा हत्याकांडात गेल्या साडेसहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणीला दोन लाख रुपयांच्या व्यक्तीगत हमीपत्रावर विशेष सीबीआय कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
इंद्राणी मुखर्जीने एकही पॅरोल घेतला नव्हता. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तिला जामीन दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT