Sheetal Mhatre Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sheetal Mhatre Video : "तिचं आयुष्य बरबाद होईल"; व्हायरल व्हिडीओनंतर भाजपा आमदार आक्रमक

या व्हिडीओची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही विधानसभेत करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शीतल म्हात्रे आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विधानसभेतही आज या व्हिडीओचा विषय झाला. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असल्याचं सांगत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आज अधिवेशनात करण्यात आली आहे.

याबद्दल भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला आहे. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनामध्ये केली आहे. तसंच आमदार यामिनी जाधव यांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. शीतल म्हात्रेंचं आयुष्य या प्रकरणात बरबाद होईल, असंही चौधरी म्हणाल्या आहेत.

याबद्दल बोलताना मनिषा चौधरी म्हणाल्या,"शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. नगरसेविका राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत रॅलीतील व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचं. यावर कधी कारवाई होणार? या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल. ती विवाहीत महिला आहे. ज्याने हे केलं त्यावर कारवाईचे आदेश द्यावेत."

या प्रकरणात शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक कऱण्यात आली आहे. यातल्या काही जणांचं उद्धव ठाकरे गटाशी संबंध असल्याचंही आढळून आलं आहे. पण या तिघांविरोधात आता आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT