Sheetal Mhatre esakal
महाराष्ट्र बातम्या

Sheetal Mhatre : ''खासदारकीसाठी तुम्ही दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?'', शीतल म्हात्रेंचा रोख कुणाकडे?

संतोष कानडे

मुंबईः शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या 'एक्स' अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी 'चतुरताई' असा उल्लेख करुन खासदारकी संपत आल्याने पुन्हा खासदारकी मिळावी यासाठी दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

व्हिडीओमध्ये शीतल म्हात्रे काय म्हणतायत?

प्रिय चतुरताई,

तुम्ही खासदारकी कशी मिळवलीए हे खरंतर लोकांना सांगितलं पाहिजे. मराठीचा गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना.. शिवसेनेचा संबंध नसतानाही आपण खासदारकी मिळवली.

आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसून येतेय. 'बुलंदी'मधला डायलॉग तुम्हाला माहिती नसेल.. बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मुँह में हात डालने.. अशीच तुमची परिस्थिती झाली आहे.

काहीही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंत, हे लोकांना सांगा. परत खासदारकी मिळावी, यासाठी तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात? आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी खासदारकी द्या.. असं सागणाऱ्या तुम्ही... त्यामुळे कुणाला बोलताय, याचा विचार करा आणि भान ठेवा.

दरम्यान, शीतल म्हात्रे यांनी केलेले आरोप ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याबाबत असल्याचं बोललं जातंय. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं.

काय म्हणाल्या होत्या चतुर्वेदी?

गद्दार गद्दारच राहणार. एक चित्रपट आला होता दिवार.. त्यामध्ये अमिताभ बच्चन हात दाखवतो त्यावर लिहिलेलं असतं मेरा बाप चोर हैं.. तसंच श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप गद्दार हैं... अशी टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT