ncp
ncp esakal
महाराष्ट्र

"शिंदे-फडणवीस सरकार अस्वस्थ अन्....; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं केलं भाकीत

रुपेश नामदास

रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यामुळं आव्हाडांना प्रचंड टीकेला सामोरो जावे लागले.

हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

त्यामुळं राष्ट्रवादीतून बड्या नेत्यांनी आव्हाडांचे समर्थन केले. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की "विरोधी पक्ष राज्यातील आणि देशातील सक्षमच असला पाहिजे, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेवून आलेला नसतो" तर आव्हाडांच्या प्रकरणावर बोलताना म्हणाले "मुख्यमंत्र्यांच्या समोर घडलेल्या प्रकारावर, पोलिसांनी केलेली कारवाई ही सूडाची भावना आहे." (Eknath Shinde, Devendra Fadnavis)

"परंतु असं कृत्य केलेले मंत्री या सरकारमध्येच आहेत. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही", पुढं म्हणाले " बहुमतातील सरकार पहिल्यांदाच अस्थिर असलेले पाहिला मिळतंय. अलीकडच्या काळात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाई त्याच बरोबर सरकार मधील जबाबदार मंत्री महिलांवर करत असलेले बेजबाबदार वक्तव्य हे पाहिल्यानंतर या सरकारची अस्थिरतेकडे वाटचाल आहे. हे पाहता राज्यात मध्यावर्ती निवडणूका लागू शकतात" असं मत त्यांनी व्यक्त केल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT