Mahavikasaghadi Government  
महाराष्ट्र बातम्या

''दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार पडणार अन् महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार''

शिंदे-फडणवीस हे सरकार छळकपट हिटलरशाही आणि दबाव यंत्रणांचा वापर करुन आलं

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सत्र सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी मोठं विधान केलं आहे. दोन महिन्याभरात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली यांनी केलं आहे. रूपाली पाटील या बारामतीत गोविंद बाग या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, 'शंभुराज देसाई म्हणतात पुढचे 25 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही. पण त्यांनी 25 वर्षाच्या सत्तेची भाषा करू नये, मुळात आत्ताच जे सरकार सत्तेत आलंय ते शिंदे-फडणवीस हे सरकार छळकपट हिटलरशाही आणि दबाव यंत्रणांचा वापर करुन आलं आहे. त्याचबरोबर महिना दोन महिन्यांमध्ये काय परिस्थिती होतेय ते बघा. हे सरकार परत उलटणार आणि महाविकास आघाडी परत सत्तेत येणार असंही त्या म्हणाल्यात.

त्या पुढे म्हणाल्या की, आमदार सांभाळणं महाराष्ट्राचा कारभार सांभाळणं तेवढं सोप्प नाही ते फक्त अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. राज्य सांभाळनं एकनाथ शिंदे यांना जमणार नाही असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT