milind Narvekar & eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: मविआ नेत्यांची सुरक्षा काढली पण नार्वेकरांची वाढवली, राजकीय खेळी?

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांची सुरक्षा काढली

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. सरकारने पवार आणि ठाकरे कुटुंब वगळता मविआच्या इतर बड्या नेत्यांची सुरक्षा काढलीय. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केली असून त्यांना आधी एक्स प्लस सुरक्षा होती. मात्र आता त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आणि एक्सकॉर्ट देण्यात आलीय.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जाणारे मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार या चर्चाना उधाण आलं होतं. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी बऱ्याचदा दावा केल्यामुळे मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जातील का याकडे सर्वांच लक्ष्य लागलं होतं. अशातच मागे गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या आणि अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांची बीसीसीआयच्या सेक्रेटरपदी फेरनिवड झाल्यानंतर त्यांचेही अभिनंदन करत ट्विट केले होते. त्यानंतर मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार या चर्चाना उधाण आलं होतं. दरम्यान आता मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारची हे खेळी आहे का, की मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाण्याचे संकेत आहेत का? अशा चर्चा आता पुन्हा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

तर महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, नितीन राऊत, बंटी उर्फ सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनील केदारे आणि डेलकर परिवार यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र आता शिंदे सरकारने वरुण सरदेसाई यांची देखील सुरक्षा काढली आहे. तसेच पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेल्या संजय राऊत, 100 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणात त्याच कारागृहात असणारे राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मनी लाँड्रींगप्रकरणी आर्थर तुरुगांत असणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या तिघांची देखील सुरक्षा हटवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT