Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे-फडणवीस सरकार हिंदुत्वद्रोही; नामांतराच्या स्थगितीवरुन राऊतांचं टीकास्त्र

ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली

धनश्री ओतारी

शिवसेनेला विरोध करण्यासाठी नामांतराला स्थगिती दिली असा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल चढवला आहे. ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.(shinde government postpones aurangabad osmanabad name change Sanjay Raut maharashtra politics)

संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नामांतराला स्थगिती देण्याच्या निर्णयावर भाष्ट करताना यासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले.

त्या निर्णयामध्ये ठाकरे सरकरान औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील नाव देण्याचा प्रस्तावर मंजुर केला. आणि हे तिन्ही निर्णय स्थगित केले असेल तर हे सरकार हिंदूत्वद्रोही आणि महाराष्ट्र द्रोही आहे. असा आरोप राऊतांनी यावेळी केला.

काय म्हणाले राऊत?

औरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय हा प्रश्न भाजप करत होते. धाराशीव विषयीही त्यांची तिच भूमिका होती. आणि दी. बा. पाटील यांच नाव द्यावर त्यासाठी हेच लोक मोर्चे काढत होते. उद्धव ठाकरे यांनी केंद्राचा न विचार करात मोठ्या हिंमतीने एका हिंदूत्ववादी भूमिकेतून नामांतराचा निर्णय घेतला.

जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली असले तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे. असे राऊत यांनी यावेळी म्हटले.

खरतंर स्थगितीबाबत फडणवीसांना विचारायला हवं कारण शिंदेंच्या हातात काहीच नाही. औरंगजेब नातेवाईक तुमचा कधीपासून झाला असा सवाल राऊतांनी यावेळी केला. औरंगजेब हा कोण लागतो, हा उस्मान कोण लागतो त्यांच्या नामांतराला स्थगिती का देता? असे प्रश्न राऊतांनी यावेली केले. दी. बा. पाटीलांच्या निर्णयला त्यांनीदेखील पाठिंबा दिला होता. मग आता स्थगिती. मला वाटतं हे सरकार गोंधळलेल आहे.

या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांचा मेंदू बधीर झालं आहे. त्यांना काम कराव वाटत नाही. त्यामुळे फक्त त्यांना स्थगिती स्थगिती. पण स्थगिती देतानाही त्यांनी आपला विवेक हरवला आहे. अशा शब्दात राऊतांनी शिंदे फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT