Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

खोक्यांच्या आरोपांवरून शिंदे गट आक्रमक! आरोप करणाऱ्यांना पाठवणार मानहानीची नोटीस

सकाळ डिजिटल टीम

पुणे - शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीत सरकार स्थापन केलं. मात्र सरकार स्थापन करण्यापूर्वी शिंदे यांनी सर्व आमदारांना गुवाहाटी येथे नेले होते. त्यानंतर बंडखोरांवर ५० खोके घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. हे आरोप आता सातत्याने होत असून यावर शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Eknath Shine news in Marathi)

खोके घेतल्याच्या टीकेमुळे शिंदे गटाची सातत्याने प्रतिमा मलिन होत आहे. त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. त्यामुळे शिंदे गटावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला आहे.

एकनाथ शिंदे गटाचे नवनियुक्त प्रवक्ते विजय शिवतारे म्हणाले की, सुप्रिया सुळे म्हणत असतील, की ५० खोके घेऊन सरकार बनवले. तर मग अजित पवार सकाळी शपथविधीला गेले होते तर त्यांना किती खोके मिळाले होते, शरद पवार यांनी १९७८ साली काँग्रेसचे ३८ आमदार फोडून पुलोदच सरकार स्थापन केलं होते. त्यावेळी ३८ आमदारांना किती खोके दिले होते, असे सवाल शिवतारे यांनी केली.

दरम्यान यापुढे शिंदे गटावर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं शिवतारे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता शिंदे गटावर खोक्यांची टीका करणे महागात पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT