Gulabrao Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: गुलाबराव पाटीलांची मविआवर खालच्या शब्दात टीका म्हणाले, 'तीन जणांची माय...'

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना(ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा रविवारी संभाजीनगरमध्ये पार पडली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह मविआचे अनेक दिग्गज नेत्यांच्या हजेरीत ही सभा पार पडली.

या वज्रमूठ सभेमध्ये भाषणावेळी नेत्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपचे आणि शिंदे गटातील नेते ठाकरे गटातील नेत्यांवर आणि महाविकास आघाडीवर टीका करताना दिसत आहेत.

राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीला लक्ष करत त्यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आहे. तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. विकासाचं व्हिजन असावं लागतं. तीन वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडे विकास येईल कुठून? असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

कुणी काँग्रेसचा, एक काँग्रेसमधून फुटलेली राष्ट्रवादी, एक शिवसेना… ज्यांची विचारधाराच एक नाही त्यांच्या डोक्यात विकास येऊ शकत नाही, असंही गुलाबराव पाटील बोलताना पुढे म्हणालेत. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

तर गुलाबराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबतही एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले त्याला मी महत्त्व देत नाही. कारण तो त्यांचा स्पेसिफिक विचार आहे. ते भाजपचे नेते आहेत. आम्ही फक्त जी प्रॉपर युती होती, त्या युतीबरोबर जाण्याचा प्रयत्न केला आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विश्वासघाताचा बदला घेतला या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT