Shinde Group MLA Fight
Shinde Group MLA Fight Esakal
महाराष्ट्र

Shinde Group MLA Fight: महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत का भिडले? थोरवेंनी सांगितलं नेमकं काय झालं?

अंकिता खाणे (Ankita Khane)

विधीमंडळाचा आज शेवटचा दिवस असतनाच आज शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच पक्षातील हे आमदार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले. यावेळी भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली. दरम्यान याबाबत महेंद्र थोरवे यांनी माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही प्रमाणिकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. माझं दादा भुसे यांच्याशी खात्याशी संबधित माझं काम आहे, त्याबाबत मी भुसे यांना विचारलं माझ्या मतदारसंघातील काम का होत नाहीये. मी मतदार संघातील कामाबाबत प्रश्न केला तेव्हा त्यांचा आवाज वाढला. आम्ही देखील आमदार आहोत. त्यांना आम्ही मंत्री केलं आहे. ते जाणीवपुर्वक काम करत नसल्याचा आरोप थोरवे यांनी केला आहे.

आमदारांचा कामे होत नाहीत. कामे होत नसतील तर काय करणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.दादा भुसे ॲरोगंट, आमच्यामुळे ते मंत्री आहेत, मी त्यांच्या घरचं खात नाही, असं म्हणत महेंद्र थोरवेंनी दादा भुसेंवर हल्लाबोल केला आहे.

महेंद्र थोरवे पुढे बोलताना म्हणाले, ''मंत्री असणारे दादा भुसे सामान्य निमित्ताने त्यांच्या खात्यातील गोगावले, मी स्वतः असेल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील त्यांना कॉल करून सांगितलं, काम करून घ्या परंतु दादा भूसेंना सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक. आज मी त्यांना विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामे काल तुम्ही मीटिंगमध्ये घेतली आणि मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केले गेले नाही. त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर, ते माझ्यासमोर चिडून बोलले.''

'आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत, अशा पद्धतीने ॲरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे, ते जनतेचे काम. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मी तुमच्या घरचं खात नाही मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करायला पाहिजे'', असंही पुढे थोरवे यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत महेंद्र थोरवे?

महेंद्र थोरवे हे 46 वर्षांचे आमदार असून त्यांनी 2019 मध्ये कर्जत, महाराष्ट्र येथून निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी झाले. सध्या ते शिवसेना(शिंदे गट)चे आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून तिकीट मागितलं होतं.पण, त्यांना त्यावेळी उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी त्यावेळी अपक्ष निवडणूक लढवली होती. आक्रमक आमदार म्हणूनही महेंद्र थोरवे यांची ओळख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT