eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

महायुतीमध्ये खदखद! 'मोदी सरकारमध्ये आमच्यासोबत दुजाभाव झाला'; शिंदे गटाचा खासदार स्पष्टच बोलला

MP shrirang barne :मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद देऊन भेदभाव करण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद देऊन भेदभाव करण्यात आला आहे. आमचा स्ट्राईट रेट पाहता आम्हाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी खदखद व्यक्ती केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील खदखद पुन्हा समोर आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना न्यायिक भूमिका घ्यायला हवी होती. एनडीएमध्ये अनेक पक्षांना कमी जागा असताना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे गटासोबत दुजाभाव का करण्यात आला? आमच्यासोबत दुजाभाव झालाय. आमच्याकडे सात खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं होतं, असं बारणे म्हणालेत.

उदयनराजे भोसले यांच्याबाबतही बारणे यांनी भाष्य केलं. उदयनराजे यांना मंत्रीपद द्यायला हवं होतं. ते तीनवेळा खासदार आहेत. वरिष्ठ आहेत. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून त्यांचा मान राखयला हवा होता. मंत्रिमंडळात त्यांचा देखील समावेश करायला हवा होता, असं बारणे म्हणाले. अजित पवार गटाला देखील मंत्रिपद मिळायला हवं होतं अशी भूमिका बारणे यांनी स्पष्ट केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाने १५ उमेदवार उभे केले होते, त्यातील सात उमेदवार निवडून आले आहेत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील एका खासदाराला कॅबिनेट मंत्रीपद आणि एकाला राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता होती. पण, त्यांना फक्त राज्यमंत्रीपद मिळालं आहे. मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव या तीन नावांची चर्चा होती. यात प्रतावराव जाधव यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.

श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता होती. पण, शिंदे गटाला एकच मंत्रीपद देण्यात आल्याने जाधव यांना संधी देण्यात आली. त्यामुळे बारणे काहीसे नाराज असल्याचं बोललं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT