shinde group mps meet union home minister amit shah rak94
shinde group mps meet union home minister amit shah rak94 esakal
महाराष्ट्र

शिंदे गटाचे खासदार गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्रात एकनाथ शिदें यांनी केलेल्या बंडानंतर केंद्रात देखील शिवसेना खासदारांनी वेगळा गटनेता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाचे खासदार आज पहिल्यांदा गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला गेले असून त्यांनी यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीचे निवेदन शाहांना यावेळी देण्यात आले आहे.

शिवसेनेकडून देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात होते, मविआ सरकारचे मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून यासाठी प्रयत्न केले जात होते. दरम्यान आता शिंदे गटाच्या खासदार देखील या मागणीचा पाठपुरावा करताना दिसत आहेत. माराठीच्या सन्मानासाठी राज्यसभेत देखील वारंवार ही मागणी पुढे केली जात होती. दरम्यान शिंदे गटाकडून केंद्र सरकारकडे ही पहिली मागणी केली जात आहे.

दरम्यान काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhangwat) यांनी सोमवारी (ता. १) भेट घेतली. ही भेट कशासाठी घेतली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच महिना उलटूनही शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. कोर्टातूनही शिंदे गटाच्या याचिकेवर निर्णय आलेला नाही. या सर्वांसंदर्भात भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT