Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: ...तर आम्ही काँग्रेससोबत जावू पण...; भाजपच्या हालचालींना शिंदे गटाचा सूचक इशारा?

शिंदे गट काँग्रेसचा हात पकडणार?

धनश्री ओतारी

राज्यात मुख्यमंत्री पदाच्या बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचे धाराशिवमध्ये भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच भाजपच्या हालचालींना शिंदे गटाने सूचक इशारा दिला असल्याच्या चर्चेने उधाणं आलं आहे. ( shinde group ready alliance with congress Maharashtra Politics Over CM)

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नेहमीत त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक अट घातली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

टी व्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, आम्ही काँग्रेस सोबत युती करण्यास तयार, असं धक्कादायक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले.

त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत. असे सांगत भाजपच्या हालचालींना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण विविध कारणांनी चांगलंच ढवळून निघालं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरच येणार आणि राज्यातील शिंदे-भाजप सरकार कोसळणार अशा चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर, अजित पवार हे भाजपसोबत जातील आणि मुख्यमंत्री होतील, अशा चर्चाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या याद्या आज सेवा संस्थांमध्ये, यादीत नाव असल्याची खात्री करावी; आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

Akole Flood: महापुराने अकोलेचा पश्‍चिम पट्टा वेढला, दरड कोसळल्यानं दहा गावांचा संपर्क तुटला; जमिनी वाहिल्या

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

IND vs ZIM 2nd T20I: वैभव सुर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आजही पाहायला मिळणार; भारत- झिम्बाब्वे दुसरा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT