Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शिंदे गटाची ताकद वाढणार? दलित पँथरचा मिळणार पाठिंबा

शिंदे गट आणि दलित पँथरची युती होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना काही महिन्यांपूर्वी घडली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी बंड केलं आणि सत्तेतून बाहेर पडले. त्यानंतर शिंदे आणि समर्थक आमदार यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगळ्या घटना घडू लागल्या. अशातच वंचित बहुजन ठाकरे यांच्यासोबत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दोन दिवसांपूर्वी एकाच मंचावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचे संकेतही दिलेत. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी कोणते वळण घेत ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकीकडे आंबेडकर-ठाकरे युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शिंदे गटाच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. शिंदे गट आणि दलित पँथरची युती होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ही युती होईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दोन दिवसानंतर म्हणजेच 25 नोव्हेंबरला कराडमध्ये दलित पँथरच्या राज्यकार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गटासोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ शिंदे गटाला भेटून युतीचा प्रस्ताव देणार असल्याचं सांगितलं जातय. ठाकरे- आंबेडकर युतीला शह देण्यासाठीच शिंदे गटाकडून ही खेळी खेळण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT