MLA Disqualification Result Sakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Result: अजित पवार गटालाही तोच न्याय! राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचेही चित्र निकालामुळे स्पष्ट?

Ajit Pawar Group MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता अजित पवार गटाच्या भवितव्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता अजित पवार गटाच्या भवितव्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. ताजा निकाल अजित पवार गटासाठी दिशादर्शक असेल असं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रावादी काँग्रेसच्या दोन गटांपैकी अजित पवार गटाला अध्यक्षांकडून झुकते माप मिळू शकते. (Ajit Pawar Group MLA Disqualification Case)

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचा निकाल जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल नार्वेकर यांनी सुद्धा ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे सुतोवात केले आहेत. शिंदे गटाच्या निकालाप्रमाणे अजित पवार गटाचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जातंय. (shinde group won shivsena mlas disqualification result declared by rahul narvekar ajit pawar group also win)

एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे शिवसेनेतून फुटून बाहेर आले, त्याप्रमाणे अजित पवार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार गटाने आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसेच अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलाय. शिंदेंच्या शिवसेनेप्रमाणेच ही स्थिती आहे. त्यामुळे आजच्या निकालाचा आधार घेऊन अजित पवार गटाचा देखील निकाल लागू शकतो.

शिंदे गटाकडून पक्ष आमचाच असा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाचा असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे याच निकालाचा आधार घेऊन अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देतील अशी शक्यता होती. त्याप्रमाणे त्यांनी निकाल दिला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. मात्र, ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Israel Gaza Conflict: गाझावर पुन्हा हल्ल्याची तयारी; इस्राईलचा पवित्रा, हमासचे सक्रिय गट लक्ष्य करणार

Krishna River Flood Sangli : कृष्णा नदीचे पाणी सांगलीत घुसले, पाणी पातळी गेली ४० फुटांवर; कोयनेचा विसर्ग स्थिर, चांदोलीतून कपात

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून तब्बल 1 लाख 41 हजार 600 क्युसिक विसर्गाने पाणी भीमा नदीत केला

SCROLL FOR NEXT