Shivsena  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : ठाकरे की शिंदे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कोण हवं? संतोष बांगर म्हणाले, “आम्हाला तर…”

निवडणूक आयोगाचा निकाल लागण्यापूर्वी शिंदे आणि ठाकरे गटाकडून वेगवेगळे दावे

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असणारे विषय म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक आणि खरी शिवसेना कोणाची. शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं या मुद्द्यावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. याबाबत सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे.

शुक्रवारी दोन्ही गटांचा युक्तीवाद पूर्ण झाला. अशातच निवडणूक आयोगाने याबाबतच्या सुनावणीला ३० जानेवारीची तारीख दिली असुन २३ जानेवारी रोजी शिवसेनाच्या पक्षाध्यक्षाची मुदत संपत आहे. त्यामुळे पक्षप्रमुख पदावर आता शिंदे बसणार की उद्धव ठाकरे हा प्रश्न उभा आहे.

या पार्श्वभुमीवर शिंदे गटातील नेते संतोष बांगर यांनी भाष्य केलं आहे. आम्हाला एकनाथ शिंदे हेच शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावर पाहायला आवडतील, असं बांगर म्हणालेत. पक्षप्रमुखांच्या निवडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निश्चित आवडेल असं ते म्हणालेत.

काय म्हणालेत संतोष बांगर?

“शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची निवड केली जाणार आहे. या निवडीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे यांना पाहायला आवडेल,” असे संतोष बांगर म्हणाले आहेत.

येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपणार आहे. याच कारणामुळे ठाकरेंचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुख या पदावर कोण बसणार असा प्रश्न समोर आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिला असता तर हा पेचच निर्माण झाला नसता. मात्र आयोगाने ३० जानेवारी ही सुनावणीची तारीख दिल्यामुळे कायदेशीदृष्ट्या या पदावर कोण राहणार? याबाबत प्रत्येकजण तर्क वितर्क लढवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

Pune Metro: बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानकांना डावलल्याने नागरिक रस्त्यावर; मेट्रो सुरू करण्यास विरोध, आंदोलनकर्ते ताब्यात

IND vs NZ : विराट कोहली न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार? सेहवागलाही मागे टाकण्याची संधी

SCROLL FOR NEXT