Santosh Bangar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच, प्राचार्यांनाच केली मारहाण

शिंदे गटाच्या आमदाराची दादागिरी सुरूच प्राचार्यांनाच केली मारहाण

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. अशातच पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर यांचा मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

फक्त आमदार बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ दोन-तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार बांगर यांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली? याचे कारण जरी अस्पष्ट आहे. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. वारंवार आमदार कायदेमंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायंदळी तुडवतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

डॉक्टर अशोक उपाध्याय असे आमदार बांगर यांनी मारहाण केलेल्या प्राचार्याचे नाव आहे. उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना १८ जानेवारीला घडली असल्याचं सांगितलं जातं आहे.

आमदार बांगर हे प्राचार्य उपाध्याय यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मागील वर्षभरात आमदार संतोष बांगर यांनी अनेक अधिकारी कर्मचारी व कंत्राटदारांना मारहाण केली आहे आणि आता थेट शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना महाविद्यालयात जाऊन मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT