Shahajibapu Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shahajibapu Patil: आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही 'काय झाडी, काय डोंगार...' डायलॉची भुरळ

शिंदे आपल्या समर्थक मंत्री आमदार, खासदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले

सकाळ डिजिटल टीम

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री आमदार, खासदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले आहेत. या दरम्यान पुन्हा चर्चा झाली टी गुवाहाटीच्या सौंदर्याची. गुवाहाटीच्या या दौऱ्यात पुन्हा चर्चेत आले ते म्हणजे आमदार शहाजी बापू पाटील.

शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार राज्यातून सुरतला गेले आणि तिकडून गुवाहाटीला. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले आणि तेही गुवाहाटीला जाऊन पोहोचले. गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांना सांगोल्यातून आलेला एक फोन प्रचंड व्हायरल झाला. त्या फोन कॉलमधील शहाजी बापू पाटील यांचा एक डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के'. हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला, इतकंच काय तर या डायलॉगवर गाणी देखील बनली. शहाजी बापू पाटील जिथं जातील तिथं हा डायलॉग म्हणण्याची त्यांना विनंती केली जाते आहे.

दरम्यान याच डायलॉगची भुरळ आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना देखील पडली आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी शहाजी बापू पाटील यांना आता गुवाहाटी दौऱ्यावर असताना काय झाडी, काय डोंगार हा डायलॅाग म्हणून दाखवायला सांगितला आहे. शहाजी बापू पाटील यांनी हा डायलॉग मराठी मध्ये ऐकवला त्यानंतर त्यांनी हाच डायलॉग इंग्रजीतही बोलून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT