Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'तू कोण आहे....', एकेरी उल्लेख करत श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

शिवसेना फूटीपासून दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना फूटीपासून दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि आमदार, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान दिलं होतं. अदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान देताना ते म्हणाले होते की, ‘आताही एकनाथ शिंदे येथे येईपर्यंत वाट पाहण्यास मी तयार आहे.

मी एकटा बसतो त्यांना ४० जणांच्या गटाबरोबर बसू दे. पण, ते पळून का गेले? खोटं का बोलले? बेरोजगारी, परदेश दौरे, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर समोरासमोर चर्चा करू,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्याच्या या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

श्रीकांत शिंदे काय म्हणालेत?

श्रीकांत शिंदे म्हणाले, "कुणीतरी आपल्या लायकीप्रमाणे बोलल्याचं समोर आलं आहे. त्यांचे विचार कुठपर्यंत जातो हे पाहिलं. कुणीतरी त्यांना बालबुद्धी म्हणून संबोधलेलं होतं. माझ्या मुलालाही जास्त समजतं. विचारांची दिवाळखोरी राज्याने पाहिलेली आहे. मुख्यमंत्री घाबरून गेले म्हणणे हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री गृहमंत्रालयाकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीला गेले आहेत", असंही श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

पुढे ते श्रीकांत शिंदे म्हणाले की, "अडीच वर्षात मुख्यमंत्री आपल्याबरोबर चोवीस तास असायचे. म्हणून २४ तास मुख्यमंत्री घरीच बसतात, असं त्यांना वाटलं. पण, तू कोण आहे, तुला मुख्यमंत्री कशाला घाबरतील. मुख्यमंत्री दिवस-रात्र काम करत आहेत, राज्याने पाहिलं आहे. ऑनलाईन येऊन गरम पाणी प्या, स्वत:ची काळजी घ्या, फक्त सल्ले देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही. जमिनीवर उतरून लोकांचे अश्रू पुसण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत", असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "तुमचं वय किती, बोलता किती. मुख्यमंत्र्यांची जेवढी कारकीर्द आहे, तेवढं तुमचं वयही नाही. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व फुकट मिळालं आहे. पक्ष वाढीसाठी काय करावं लागतं, तुम्हाला काय कळणार?" अशी टीका श्रीकांत शिदेंनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT