Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : ..तर कोणीही विकत घेतलेल्या बहुमतावर सरकार पाडणार नाही; राऊतांचा कोणाला इशारा?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता.

सकाळ डिजिटल टीम

Shinde vs Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. दरम्यान, सात न्यायमूर्तींकडं हे प्रकरण देण्याची ठाकरे गटाची मागणी सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) नाकारलीये.

त्यामुळं ठाकरे गटाला हा एकप्रकारचा धक्का मानला जात आहे. पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. या सुनावणीनंतर शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिलीये.

राऊत म्हणाले, 'हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडं जावं अशी आमची मागणी आहे. या निकालाला वेळ लागला तरी, संपूर्ण देशापुढं एक पारदर्शक असा निकाल येईल. त्यामुळं भविष्यात कोणीही, कोणतंही सरकार पैसा, विकत घेतलेलं बहुमत या जोरावर सरकार पाडू शकणार नाही.'

अपात्रतेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आमच्या दृष्टीनं सगळे आमदार (शिंदे गट) अपात्र आहेत. आता त्यांच्यावर निवडणूक आयोग आणि न्यायालयानं शिक्कामोर्तब करायचं आहे. घटनाबाह्य सरकार कितीकाळ चालवायचं हे न्यायालयाला ठरवावं लागणार आहे, असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT