chandrashekhar rao sakal
महाराष्ट्र बातम्या

सोशल डिकोडिंग : बीआरएस : चर्चेचा नवा केंद्रबिंदू

‘अब की बार, किसान सरकार’ अशी घोषणा देत नांदेडमधून जाहीर सभा घेऊन तेलंगणचे मुख्यमंत्री कलवाकुंतला चंद्रशेखर राव उर्फ केसीआर यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाने महाराष्ट्रात शिरकाव केला.

शीतल पवार shital.pawar@esakal.com

‘अब की बार, किसान सरकार’ अशी घोषणा देत नांदेडमधून जाहीर सभा घेऊन तेलंगणचे मुख्यमंत्री कलवाकुंतला चंद्रशेखर राव उर्फ केसीआर यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाने महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यापूर्वीच काही महिने पक्षाने महाराष्ट्रात वेगवेगळ्या माध्यमांतून ‘तेलंगण विकास मॉडेल’ मांडायला सुरुवात केली होती.

याची सुरुवात झाली राव यांच्या राष्ट्रीय राजकारणात विस्तारण्याच्या अपेक्षेने. त्यातूनच ५ ऑक्टोबर २०२२ रोजी के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली. आपल्या ‘तेलंगण राष्ट्र समिती’चे (टीआरएस) नाव बदलून ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस) असे केले.

राष्ट्रीय विस्तारापूर्वी...

भाषिक अस्मिता आणि त्याभोवतीची राजकारणे स्वतंत्र भारतात नवीन नाही. त्यातूनच तेलगू भाषिक लोकांचे वेगळे राज्य असावे या मागणीवरून इसवीसन १९५६ मध्ये आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली होती. स्थानिक राजकारण आणि भाषिक अस्मितेच्या संदर्भातून पुढे जाऊन वेगळ्या तेलंगण राज्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. या मागणीला केसीआर आणि त्यांच्या नवीन पक्षाने बळ दिले.

युवक काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केलेले केसीआर पुढे एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वात तेलगू देसम पक्षात आले. पुढे वेगळ्या तेलंगणाच्या लढ्यासाठी त्यांनी तेलगू देसम पक्षाला रामराम केला आणि २००१ मध्ये ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ पक्षाची स्थापना केली.

पक्षस्थापनेनंतर पक्षविस्तार, निवडणुकांचे राजकारण अपरिहार्य असतेच. केसीआर आणि त्यांच्या पक्षानेही आंध्र प्रदेशच्या राजकारणात वेगळ्या तेलंगण मुद्द्यावरून राजकारणाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी २००४ मध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी करत यूपीएमध्ये सहभाग नोंदवला, तर २००९ मध्ये त्यांनी तेलगू देसम पक्ष आणि भारतीय जनता पक्षासोबत युती करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभाग नोंदवला.

भाषिक राजकारणाला शेती, पाणी, रोजगार, भूमिपुत्रांना न्याय, उद्योग - आयटी विषयांची जोड देऊन विकासाचे राजकारण आकाराला आणणारे केसीआर आणि त्यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष भरपूर गाजावाजा करत महाराष्ट्रात येऊ बघतोय. किंबहुना पोचला आहे. शेती आणि गरीबकल्याणाचा अजेंडा घेऊन राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आलेल्या पक्षाला प्रसिद्धी आणि चर्चेचा केंद्रबिंदू होण्याची संधी मिळाली आहेच. निवडणुकीचा मार्ग नेमका कसा असेल हे येत्या काळात समजेलच.

(संदर्भ : Old History, New Geography: Bifurcating Andhra Pradesh ; जयराम रमेश)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT