Shiv Jayanti 2023 Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Jayanti 2023 : आग्र्याच्या लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र सरकार या कार्यक्रमाचं सह आयोजन करण्यास तयार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आग्र्याच्या लाल किल्ला परिसरामध्ये शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारण्यात आल्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. मात्र आता लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारने याविषयी पुरातत्व खात्याला पत्र दिलं आहे.

आग्र्याच्या लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर संतापलेल्या शिवप्रेमींनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र आता महाराष्ट्र सरकार सह आयोजक होण्यास तयार आहे. त्यामुळे लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबद्दल महाराष्ट्र सरकारने पुरातत्व खात्याला पत्र लिहिलं आहे. हायकोर्टाने घालून दिलेल्या अटींप्रमाणे आपण या शिवजयंती कार्यक्रमाचे सहआयोजक होण्यास तयार आहोत, असं महाराष्ट्र सरकारने म्हटलं आहे. आर आर पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील यांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.

आग्र्यामध्ये छत्रपती शिवरायांना औरंगजेबाकडून कैद कऱण्यात आलं होतं आणि त्यातून महाराजांची सुटका कऱण्याची ऐतिहासिक घटनाही घडली होती. याच घटनेला उजाळा देण्यासाठी आग्र्यात शिवजयंती साजरी करण्याचं शिवप्रेमींनी ठरवलं होतं. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रही दिलं होतं. पण तरीही पुरातत्व विभागाने परवानगी दिली नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT