tanaji savant esakal
महाराष्ट्र बातम्या

आरोग्यमंत्री सावंताविरूध्द शिवसैनिकांची घोषणाबाजी! ‘एकच साहेब उद्धव साहेब’चा नारा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आरोग्यमंत्री प्रा. तानाजी साावंत यांनी सोलापूर जिल्ह्याचा मोठा दौरा केला. सोमवारी (ता. ५) रात्री मोहोळ शहरातील एका कार्यक्रमासाठी मंत्री सावंत यांचे आगमन होताच, शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ ऑनलाईन

मोहोळ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आरोग्यमंत्री प्रा. तानाजी साावंत यांनी सोलापूर जिल्ह्याचा मोठा दौरा केला. सोमवारी (ता. ५) रात्री मोहोळ शहरातील एका कार्यक्रमासाठी मंत्री सावंत यांचे आगमन होताच, शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यानी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. मोहोळ येथील बी. जी. गुंड कॉम्पेक्स येथे मुख्यमंत्री शिंदे गटाच्या मोहोळ तालुका शिवसेना कार्यालयाचे उदघाटन आरोग्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी नुतन जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, मनोज शेजवाल, तालुकाप्रमुख प्रशांत भोसले, खवणीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुकाराम भोसले, पद्माकर देशमुख, अभय देशमुख, विष्णु गायकवाड, नामदेव पवार, अमोल भोसले आदी उपस्थित होते. नामदेव महाराज काळे ,चैतन्य देशमुख , सुनील क्षीरसागर, दादासाहेब भोसले, हेमा माने, पल्लवी भोसले, अचर्ना पण्णीकर, रूपाली भोसले, सौदागर भोसले, संदीप काकडे, नाना उन्हाळे, सचिन भोसले, प्रवीण पवार, पवन गायकवाड, ज्ञानेश्वर भोसले, कोळेगावचे सरपंच भाऊराव शिंदे, नामदेव केवळे, बाळासाहेब दाईंगडे, सिद्धेश्वर खरात, हणमंत खरात, भाऊसाहेब गावडे, भगवान शिंदे, सॅम वाघमोडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सावंत म्हणाले, प्रशांतबापू भोसले यांच्यासारखा होतकरू कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ता तालुकाप्रमुख झाला आहे. त्यांच्यासह सर्वच नूतन पदाधिकाऱ्यांना सहकार्य करा, मी व महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भोसले यांनी केले. मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, कामती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र द्यावे, कामती भागात १०८ रुग्णवाहिकेचे सेंटर करावे, पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर पेनूर येथे ट्रामा सेंटर करावे, अशा मागण्या त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केल्या. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कोरे यांनी, तर आभार केवळे यांनी मानले.

मंत्री सावंत यांच्याविरूध्द घोषणाबाजी

आरोग्य मंत्री तानाजी सावंत मोहोळ शहरामध्ये आगमन करण्याच्या काहीवेळ अगोदर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांचे समर्थक युवासेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांनी कार्यकर्त्यासह अचानक उड्डाणपुलाखाली मंत्री तानाजी सावंताच्या विरोधात घोषणाबाजी केली. गद्दार मंत्री, अशाही घोषणा करीत शिवसैनिकांचा रस्त्यावरच हा राडा सुरु होता. त्यावेळी पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी तत्काळ पोलिसांची कुमक मागवून घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

अपेक्षित गर्दी पहायला मिळाली नाही

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातुन तालुक्यातील कोणकोण शिंदे गटात प्रवेश करणार, याची सर्वांनाच सकाळपासून उत्सुकता होती. पण, मोहोळ शहरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती कार्यक्रमाला बोटावर मोजण्या इतपतच पहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT