Shiv Sena vs Shiv Sena Verdict  
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे गटाचे १४ आमदारही पात्र, पण 'पक्ष' गेला...; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचा व्हिप वैध ठरवला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला पण १४ आमदार राहीले आहेत.

Sandip Kapde

Shiv Sena vs Shiv Sena Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आज (बुधवार) मोठा निर्णय दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र केलं नाही. मात्र शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे.

राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचा व्हिप वैध ठरवला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला पण १४ आमदार राहीले आहेत. एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका राहुल नार्वेकर यांनी फेटाळल्या आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांचेही आमदार पात्र आहेत.

दरम्यान ठाकरे गटाने या निर्णयाला विरोध केला आहे. ठाकरे गट याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. संविधान, कायदा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा अध्यक्ष नार्वेकर यांनी केला आहे. नार्वेकरांच्या निकालानंतर राज्यात प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय. तर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी केली आहे.

नार्वेकरांनी शिंदे गटाचे भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवला, तर प्रतोद सुनिल प्रभू यांचा व्हीप बेकायदेशीर ठरवला. असे असले तरी त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या प्रत्येकी १६ आणि १४ आमदारांना पात्र ठरवण्याचा निर्णय घेतलाय. या मुद्द्यावर शरद पवार यांनी बोट ठेवलंय. अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू भक्कम होईल, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT