Ajit Pawar And Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

ShivSena Advertisement: जाहिरात देणारा 'तो' हितचिंतक कोण?; अजितदादांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची खैरात

शिवसेनेनं काल राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती छापून आणल्या होत्या, त्यावर टीका झाल्यानतंर आज पुन्हा नव्यानं जाहिराती दिल्या.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेनं काल राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती छापून आणल्या होत्या, त्यावर टीका झाल्यानतंर आज पुन्हा नव्यानं जाहिराती दिल्या. पण यावरुन आता विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

इतक्या प्रचंड खर्चाच्या जाहिराती देणारा शिवसेनेचे हितचिंतक कोण आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. (Shiv Sena Advertisement Who is that well wisher giving advt Ajit Pawar questions to CM Eknath Shinde)

कालच्या जाहिरातीबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजे होती. आजची जाहिरात म्हणजे कालच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये तुम्ही भाजप आणि शिवसेनेचा जाहिरातीत उल्लेख केला आहे तर मग फक्त शिवसेनेच्या ९ मंत्र्यांची खाली माळ लावली आहे.

भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत? ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे, त्यातील ५ मंत्री हे वादग्रस्त आहेत. दोन दिवसांपासून यांच्याविरोधात माध्यमातून सातत्यानं बातम्या सुरु आहेत. मग अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का?, असा सवाल पवारांनी विचारला आहे. (Latest Marathi News)

हे सगळं घडत असताना कालच्या जाहिरातीबाबत शिवसेनेच्या एका मंत्र्यानं सांगितलं की, त्यांच्या एका हितचिंतकानं ही जाहिरात दिली आहे. कोण हितचिंतक आहे? पहिल्या पानावर महत्वाच्या अनेक पेपरला जाहिराती दिल्या जातात. या जाहिरातीला किती खर्च येतो हे सर्वांना माहिती आहे. हा हितचिंतक कोण आहे? त्याच्याकडं कशा पद्धतीनं पैसा आला आहे? असा खडा सवालही त्यांनी केला. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, खरंतर जनतेच्या मनात काय आहे हे निवडणूक घेतल्यानंतरच आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. तुमच्या सरकारबद्दल तुम्हाला इतकं आत्मविश्वास असेल. इतकं जनतेचं पाठबळ असेल असं तुम्हाला वाटत असेल तर जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही ते दाखवू इच्छित असाल तर निवडणुकीला सामोरं जा. तुम्हाला मुख्यमंत्रीपदं मिळाली, तुम्हाला मंत्रीपदं मिळाली. इतरांना २३ जागा खाली आहेत त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? असा सवालही अजित पवारांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT